भयंकर! चुलत भावाकडून तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुणाने आपल्या तीन वर्षांच्या सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असून आरोपी सध्या फरार आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत येथे शुक्रवारी दुपारी ही भयंकर घटना घडली. पीडिता आपल्या मोठ्या काकांच्या निर्माणाधीन घराबाहेर खेळत होती. तेव्हा तिचा चुलत भाऊ तिथे पोहोचला आणि तिला घेऊन गेला. तीन तासांनी त्याने तिला पुन्हा पहिल्या जागी आणून सोडलं. पण, तेव्हा तिची परिस्थिती पाहून तिचे कुटुंबीय तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तेव्हा बलात्काराबाबत सत्य उघड झालं.

पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस सर्वत्र त्याचा शोध घेत आहेत.