गडचिरोलीत दोन नक्षल्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षलवाद्यांना अंकुश लावण्यासाठी नक्षलग्रस्त परिसरात पोलिसांनी कंबर कसली आहे, नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रविवारीं सकाळी चकमक झाली. गडचिरोलीत नरकसा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन नक्षली ठार झाले आहेत. मृतामध्ये एक महिला नक्षलीचा समावेश आहे.