प्रसारमाध्यमांत, व्यवहारात ‘दलित’ शब्दाला मनाई नको – रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी व्यवहार, प्रमाणपत्रे आदी व्यवहारांत ‘दलित’ हा शब्द कापरता येणार नाही. याबाबत राज्य सरकारने बुधवारी शासन निर्णय जारी केला असला तरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला विरोध केला. सरकारी नोंदीमध्ये ‘दलित’ शब्दाला मनाई ठीक आहे, मात्र व्यवहारात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये दलित शब्दाला मनाई करता कामा नये अशी भूमिका आठकले यांनी आज मांडली.

दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच ‘भारतीय दलित पँथर’ या संघटनेची आम्ही स्थापना केली होती असे सांगत बोलण्यामध्ये, भाषणांमध्ये वृत्तपत्र मीडिया माध्यमांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार नाही. सरकारी दस्तऐवजांमध्ये यापूर्वीपासून ‘अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग केला जात असल्याने व्यवहारात दलित शब्दाला मनाई नसावी असे ते म्हणाले.