पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प, वाचा का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे वृत्त आहे. पीएमसी या नावाने ओळखली जाणारी ही बँक डबघाईला आल्याने आरबीआयने बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पीएमसी बँकेच्या शाखांमध्ये खातेधारकांची गर्दी वाढत असून त्यांच्यात गोंधळाचं वातावरण आहे.

rbi-pmc-order

अनेक खातेधारकांनी या संबंधी ट्वीट करून तक्रारी केल्या आहेत. पैसे काढणे, भरणे किंवा कोणतेही व्यवहार करता येत नसल्यामुळे खातेधारक तणावात आहेत. आरबीआयने परिपत्रक काढून या निर्बंधांची माहिती दिली आहे. आरबीआयच्या बी. आर. कायद्याच्या कलम 35अ नुसार 23 सप्टेंबर 2019पासून पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार आरबीआयच्या परवानगीशिवाय बँकेला आता कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

बँकेबाहेर खातेधारकांची गर्दी वाढत असून त्यांच्यात गोंधळाचं वातावरण आहे. पाहा व्हिडीओ-

या दरम्यान ग्राहकांना खात्यातून फक्त 1 हजार रुपयेच काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याखेरीज फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिटचे व्यवहार, पगारांची रक्कम, कायदेशीर व्यवहारांसाठी होणारा आर्थिक खर्च, बिले, कर, भाडे यांचे व्यवहार कायम राहणार आहेत.