
जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथील माऊली अशोक पागीरे (२९) या तरुण शेतकर्याचा मंगळवारी सकाळी शेतात काम करत असतांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
माऊली अशोक पागिरे हे मंगळवार दि. (२४ सप्टेंबर) रोजी सकाळी शेतात पेरणी करत होते. पेरणी करत आसलेल्या या शेतातून कुपनलीकेशाठी विजेची केबल टाकण्यात आली आहे. यावेळी पेरणी करताना या कुपनलिका व त्यासाठी ठेवण्यात आलेल्या पॅनल पेटीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ते केबल व पेटी बाजुला ठेवण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी या पेटीत विद्युत प्रवाह उतरला होता याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी पेटीस हात लावताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व याघटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
माऊली पागीरेच्या पाठीमागे, आई , वडील, पत्नी एक ७ महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.त्यांचे शवविच्छेदन करमाळा येथील जिल्हा उपरुग्णालयात करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच करमाळा येथे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

























































