
नगर दौंड महामार्गावर नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक-कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये मरण पावलेले सर्व तरुण नगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
अनिरुद्ध भुजबळ, शुभम खेडकर, असिफ पठाण व गोपीनाथ कुऱ्हाडे असे मृत तरुणांची नावे आहेत. मध्यरात्री अडीच वाजता अपघात झाला. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्या आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



























































