पीएमसी बँकेतून 10 हजार काढता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँकेने पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणल्याने हवालदिल झालेल्या हजारो सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत खात्यावरून केवळ एक हजार रुपये काढण्याची मर्यादा होती ती आता 10 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे.

सर्वसामान्य कष्टकऱयांची बँक अशी ओळख असलेल्या पीएमसी बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) अचानक वाढल्याने बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्याची गंभीर दखल घेत आरबीआयने सोमवारी बँकेवर व्यवसाय करण्यावर निर्बंध आणले होते. तसेच खातेदारांना खात्यावरून केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी दिल्याने संताप व्यक्त होत होता. दरम्यान, आरबीआयने आज बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम खात्यावरून काढण्याबाबत नोटिफिकेशन काढले आहे. आतापर्यंतच्या निर्बंधानुसार ज्यांनी एक हजार रुपये रक्कम काढली आहे ते धरून 10 हजार रुपये काढता येणार आहे.