हे माजी आमदार करणार पाचव्यांदा पक्षांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीत, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश. तिथेही फारसे जमले नाही  म्हणून मग पुन्हा काँग्रेस प्रवेश करत काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विराजमान. त्यानंतर पुन्हा काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची  वाट माजी आमदार रमेश कदम यांनी धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की, पक्ष अडचणीत आहे. तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची मला गरज आहे. तू पुन्हा पक्षात ये असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाल्याचे कदम यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.