
>> जतिन पंडित
हिंदुस्थानी चित्रपट संगीताची जर बाराखडी लिहायची म्हटलं तर त्याचा पहिले अक्षर लता मंगेशकर आणि शेवटचे अक्षरदेखील लता मंगेशकर असेल!
1991 मध्ये आमच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली आणि जवळजवळ तेव्हापासूनच आमच्या सान्निध्यात दीदी आल्या. आमच्या दीदींसोबतच्या गाण्यांनी लोकप्रियेतचा कळस गाठला. ‘प्यार तो होना ही था’, ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ या फिल्म्सनी… दीदी म्हणजे त्यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक दिवशी संगीताविषयी समर्पण म्हणजे काय असते याचा अनुभव येत असतो. दीदींनी त्यांचे एक पुस्तक मला त्यांची स्वाक्षरी करून भेट दिले हा माझ्या जीवनातला मोठा ठेवा आहे.
दीदी आणि आमचे स्नेहसंबंध कामादरम्यान प्रगाढ होत गेले आणि मग दीदी आमच्याशी फ्रेंडली झाल्या. अनौपचारिकपणाचे आवरण कधी गळून पडले ते मला आणि ललितला (जतीन-ललित जोडीतील भाऊ ललित) कळलेही नाही. इतक्या वर्षांच्या ऋणानुबंधात असताना दीदींबद्दल जाणवलेली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन ओळी, एक मुखडा, अंतरा जरी गायचा असला तरी त्यांनी त्यांच्या कामाला कधीही गृहीत धरले नाही. त्या नेहमी गाण्याची प्रॅक्टिस, रियाझ, रिहर्सल करूनच स्टुडिओत पाऊल टाकत .‘कभी खुशी कभी गम’च्या रेकॉर्डिंग वेळेस त्यांनी स्टुडिओत एका रिहर्सलसाठी येणे अपेक्षित होते, पण त्यांनी गाणे इतके क्लासिक म्हटले की हेच गाणे फायनल टेक झाले.
शब्दांकन – पूजा सामंत

























































