काव… काव! म्हाळवसाचा धसका राव! पहिल्याच दिवशी फक्त 14 उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र उमेदवारांनी सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाचा धसकाच घेतल्याचे दिसून आले आहे. राज्यभरातील 288 मतदारसंघांपैकी केवळ 14 मतदारसंघांतून 14 उमेदवारांनी 15 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यास सुरुवात झाली, मात्र प्रत्यक्षात अर्ज भरण्यास फारच किरकोळ प्रतिसाद लाभला. पितृपक्षाचा मोठा परिणाम निवडणूक अर्ज भरण्यावर दिसून आला आहे.