जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मरीमधील रामबान येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत एक जवान शहीद तर दोन पोलीस जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून युद्धासाठी वापरण्यात येतो तसा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

रामबान येथील बाटोट भागात पाच दहशतवाद्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत एका व्यक्तीची गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीने गाडी थांबविली नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने याबाबत सुरक्षा जवानांना कळविले. त्यांनी तत्काळ त्या भागात शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवादी एका घरात घुसले असून त्यांनी घरातल्या एका व्यक्तीला स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे.