अमित शहा यांचा गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी शनिवारी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर 2014मध्ये राजीनामा दिल्यानंतर अमित शहा यांच्याकडे या असोसिएशनचे अध्यक्षपद आले होते. मोदी यांनी 15 सप्टेंबर 2009मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते नरहरी अमीन यांच्याकडून ‘जीसीए’चे अध्यक्षपद स्वीकारले होते. अमीननंतर भाजपमध्ये सहभागी झाले होते. गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री व मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांची त्यावेळी ‘जीसीए’चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

मात्र, आता नवीन अध्यक्षासाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनला काही दिवस वाट बघावी लागेल. सर्व क्रिकेट संघटनांनी तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी पद सोडावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2016मध्ये दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी ‘जीसीए’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.