
बॉलीवुडवर आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर छोटया पडद्यावरही शहेनशहा ठरलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती 11’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. केबीसीचा हा 11 वा सिझन असून प्रेक्षक त्यालाही मनापासून दाद देत आहेत. पण छोट्य़ा पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेट (Jennifer Winget) हिने केबीसी बंद होणार असून त्या कार्यक्रमाच्या जागी तिची ‘बेहद 2 ‘ ही मालिका पुन;प्रसारित होणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाज व अप्रतिम सूत्रसंचालनामुळे केबीसी सुरुवातीपासूनच लोकप्रिय झाली होती. पण आता ती बंद होणार असल्याचे जेनिफरने सांगितल्याने केबीसीचे चाहते हिरमुसले झाले आहेत.





























































