बिहारमध्ये पावसाचे धुमशान सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारची राजधानी पाटणासह राज्यातील चार जिह्यांवरील पावसाची अवकृपा थांबण्याची चिन्हेच दिसत नाहीत. पाटणा, खगरिया आणि बेगुसराय या जिह्यांत पावसाने घातलेल्या धुमशानामुळे या जिह्यांत जलप्रलयाची भीषण स्थिती असल्याने ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पाटणा शहराच्या पॉश वस्त्यांतही गेले काही दिवस काही फूट पाणी भरल्याने जिल्हा महानगर दंडाधिकाऱयांनी 3 आणि 4 ऑक्टोबरला शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने येत्या 48 तासांत बिहारच्या या चार जिह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बिहारमधील पावसाच्या तुफानी बॅटिंगमुळे चार जिल्हे पूरग्रस्त घोषित करण्यात आले असून या जिह्यांना तत्काळ बचाव सामग्री पुरविण्याचे आदेश बिहार राज्य प्रशासनाने दिला आहे.

भाजपकडूनही सरकार लक्ष्य

राज्यातील पाटणा आणि अन्य शहरी भागांतही पुरासारखी स्थिती निर्माण झाल्याने विरोधकांसह मित्रपक्ष भाजपनेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पाटणासारख्या शहरात होडय़ांनी नागरिकांना प्रवास करावा लागतोय ही लाजिरवाणी स्थिती असल्याची टीका केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केली आहे.