
#MahaElection 2019 शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी शिवालय शाखा, लोअर परळ येथून थोड्याच वेळात सुरुवात झाली आहे. गीता टॉकीज येथील महानगरपालिका कार्यालयात असणाऱ्या निवडणूक कार्यालयात 11 वाजता आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या अर्ज भरण्यासाठीच्या महायात्रेचे Live Update
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया
“पहिल्या प्रथम मी इथल्या शिवसैनिकांना, जनतेला त्याचप्रमाणे कट्टर शिवसैनिक सुनील शिंदे यांना धन्यवाद देतो. इथल्या जनतेने आणि तमाम शिवसैनिकांनी आदित्यचा आनंदाने स्वीकार केला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.”
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/AAOWDODNAk— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 3, 2019
- आतापर्यंत आम्ही निवडणुका लढवत नव्हतो, पण ही नवी पिढी आहे, यंग पिढी आहे
- जनतेची सेवा करणे ही आमच्या कुटुंबीयांची परंपरा आहे तिच परंपरा कायम राहिली आहे याचा आनंद आहे
- जनता आणि शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत
- उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानले
- आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, तेजस ठाकरे आणि अन्य कुटुंबीय उपस्थित
- आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा गर्दी
- जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणला
- वरळी भगव्या रंगात रंगली
- आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला सुरुवात, वरळीत जल्लोष-आनंदाचे वातावरण
आदित्य ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले तो क्षण…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2019
- मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या
- माझ्याहातून चांगले कार्य आणि देशसेवा घडावी, अशी इच्छा व्यक्त केली
- नातेवाईकांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
- शिवसेनाप्रमुखांची विशेष आठवण येते
- सर्वांचे आशीर्वाद घेऊन निघालो
- आदित्य ठाकरेंचा मीडियाशी संवाद
- आदित्य ठाकरे मातोश्रीवरून वरळीच्या दिशेने रवाना
- महिला शिवसैनिकांनी नाचत, फुगड्या घालत आनंद व्यक्त केला
- शिवसैनिकांचा उत्साह शिगेला
- विविध धर्मातील लोकांची उपस्थिती
- ढोल ताशांच्या गजाराने परिसर दणाणला
- आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे वरळी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण
























































