MahaElection – आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray-cm-fadnavi

#MahaElection 2019 शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यासाठीच गुरुवारी ते वरळीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसैनिकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. आज अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे मातोश्रीवरून निघाले असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर संवाद साधून शुभेच्छा दिल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरे यांचा अर्ज भरण्यासाठीच्या रॅलीचे Live अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेसाठी अर्ज भरण्यापूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळचा एक फोटो आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ट्वीट केला. आदित्य ठाकरे यांनी घरातील सर्वांचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Live – वरळीतून आदित्य ठाकरे यांनी अर्ज भरला, ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती