राष्ट्रवादी उमेदवार फक्त बुजगावण्यासारखे – खासदार प्रतापराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राजवाड्यापासुन तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढुन निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. खेडेकर यांनी त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विवेक काळे यांच्याकडे सोपविला आहे. त्यानंतर आयोजित केलल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांच्यात हातात शिवबंधन बांधले.

यावेळी सभेत खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधी उमेदवारांवर चौफेर टीका करत खरपुस समाचार घेतला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने फक्त मतदार संघावर शेतामध्ये जसे बुजगावने उभे करतो तसे मतदार संघावर बुजगावने उभे केले आहेत. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार पक्षात दिसणार नाहीत. सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या निधनानंतर डॉ. शिंगणे हे अनुकंपातत्वानुसार आमदार झाले, परंतु डॉ. शशिकांत खेडेकर व मी सुध्दा खुप स्पर्धा परीक्षा दिल्या व नंतर आमदार व खासदार झालो. परंतु राष्ट्रवादीचे आमदार हे गेली वीस वर्ष अनुकंपाखाली व जातीपातीचे राजकारण करत मतदार संघातील लोकांची दिशाभुल करत सहकार क्षेत्राचे वाटोळे करत आहेत’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.