Video- विविधतेत एकता! दुर्गेच्या समोर मंत्रोच्चार, अझान आणि चर्च बेल्सचा गजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात नवरात्रोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. हिंदुस्थानातील सर्वात सुंदर अशी दुर्गापूजा जिथे होते त्या पश्चिम बंगालमध्येही वाजतगाजत दुर्गेची आराधना करण्यात येत आहे. षष्ठीला स्थापन झालेल्या दुर्गेसमोर पुष्पांजली, सिंदूरखेला अशा पारंपरिक प्रथांना संपन्न केलं जात आहे. अशा पार्श्वभूमीवर कोलकात्यातील एक दुर्गोत्सव मंडळ लक्ष वेधून घेत आहे.

कोलकात्यातील बेलिघाट येथील 33 पॅली दुर्गा पूजा पंडाल येथे दुर्गेला केलेल्या आराशीत सर्वधर्मसमभाव आणि विविधतेत एकता या शिकवणींना दर्शवण्यात आलं आहे. येथील दुर्गेची मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एरवीच्या बंगाली दुर्गेच्या महिषासूर मर्दिनीच्या रुपाऐवजी उमललेल्या कमळात स्थिर बसलेली दुर्गा, सोबत चारही दिशांना सरस्वती, लक्ष्मी, गणपती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. सोनेरी पिवळ्या रंगाच्या दिव्यांची आरास करण्यात आली असून त्या प्रकाशात दिसणारं देवीचं प्रसन्न अभयवदन रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

देवीच्या मूर्तीप्रमाणेच देवीमंडपाची आरासही वैशिष्ट्यपूर्ण असल्याने यंदाचा या मंडळाचा दुर्गोत्सव अनोखा ठरला आहे. कारण, मंडपाच्या सजावटीत हिंदू धर्मातील ओमकार, मुस्लिमांचा चांदतारा आणि ख्रिश्चनांचा क्रॉस यांची अनुक्रमे भगवा, हिरवा आणि सफेद अशा तीन रंगांमधली आरास लक्ष वेधून घेत आहे. या धर्मांची वैशिष्ट्य असणारे मंत्रोच्चार, अझान आणि चर्चच्या बेल्स यांचा गजरही करण्यात येत आहे. या गजरातून सर्वधर्म समभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दुर्गापूजा मंडळाने केला आहे.

पाहा व्हिडीओ-