
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराच मानली जाते. मंगळवारी वाजतगाजत आणि गुलाल उधळत लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जमले होते. यावेळी शिवतीर्थावर जणू ‘शिवसागरच’ उसळला आहे. ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात साजरा झालेल्या या दसरा मेळावामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला.
‘अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की आता राजकारणाचा स्तर खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार. हरकत नाही पण धरणात पाणी नसले तर काय करणार? अजित पवार यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, तेव्हा ते काय म्हणाले होते. त्यांच्या कर्मामुळेच अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले आहे’, असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की आता राजकारणाचा स्तर खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार. हरकत नाही पण धरणात पाणी नसलं तर काय करणार?”
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे#दसरामेळावा pic.twitter.com/DZ2n0vSGXi— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 8, 2019
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे सोलापुरात बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकली आहे असे विधान केले. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 50 ते 60 वर्षे खाऊन खाऊन थकले का तुम्ही? जास्त थकू नका, आता आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी जरा ताजेतवाने रहा’, असा टोला त्यांनी लगावला.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-६० वर्षे खाऊन खाऊन थकले का तुम्ही? जास्त थकू नका, आता आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी जरा ताजेतवाने रहा.”
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे#दसरामेळावा pic.twitter.com/NZEMFRB6PE— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 8, 2019























































