संभाजीनगरात पत्नी पीडित पुरुषांनी केले शूर्पणखाचे दहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीपीडित पुरुष संघटनेच्या वतीने शूर्पणखा विचारसणीचा निषेध म्हणून मंगळवारी विजयादशमीनिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रम, करोडी येथे शूर्पणखा विचारसरणीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

महिलांकडून शूर्पणखा विचारसरणीचा अवलंब करत निर्दोष पती व पतीच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करून त्रास देत आहे. महिलांच्या या विचारसरणीमुळे कुटुंब ही संकल्पना संपुष्टात येत असून, त्याचा परिणाम समाजावर होत आहे. शूर्पणखा विचारसरणी नायनाट होऊन अधोगतीकडे जाणारे संस्कारिक पुरुष प्रगतीकडे जावो, या उद्देशाने मंगळवारी पत्नीपीडित पुरुष आश्रमात शूर्पणखा प्रवत्तीचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी पत्नीपीडित पुरुष संघटनेचे भारत फुलारे, सुरेश फुलारे, भाऊसाहेब साळुंके, संजय भांड, विशाल नांदरकर, भीमराव दाने, श्रीराम तांगडे, दत्ता कोकाट, नीलेश भाले, पांडुरंग गांडुळे, प्रमोद तरवटे, सोमनाथ मनाळ, शरद जाधव, राधेशाम पाटील व विश्वनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.