
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ प्रत्येकी एक याप्रमाणे सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिलांवर देण्यात आली. ती त्यांनी उत्तमप्रकारे पार पडली. त्यामुळे विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात 352 सचिन मतदान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 16 सखी मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी सर्व कर्मचारी महिला असणार आहे.
सर्वाधिक 4 सखी मतदान केंद्र नगर शहर मतदारसंघात असून कर्जत जामखेड मतदार संघात दोन सखी मतदान केंद्र रस्त्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली आहे. या सखी मतदान केंद्रांमध्ये पोलीस कर्मचारी पोलिसांपासून निवडणूक कामासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी सर्व महिलाच असणार आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा, यासाठी सखी मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. येथील सर्व कामे महिलांकडून नियंत्रित करण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रामध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी रांगोळी रंगरंगोटी सह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तहसील कार्यालय पोलीस ठाण्याचे किंवा ज्या मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्यांचा कायम संपर्क राहील अशा केंद्रांची सचिव मतदान केंद्र करता विशेष निवड करण्यात आली आहे. नगरमध्ये 16 सखी मतदान केंद्रे उभारले जाणार असून त्यात नगर शहराच्या कर्जत जामखेडमध्ये दोन तर इतर दहा मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे.

























































