हुंड्यात क्रेटा गाडी न मिळाल्याने प्रेम पत्राऐवजी धाडलं तलाक पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
triple-talaq

हुंड्यात क्रेटा गाडी भेट न दिल्याने नवऱ्याने आपल्या पत्नीस पत्राव्दारे तिहेरी तलाक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने नगीना पोलीस ठाण्यात नवरा, सासू-सासऱ्यासह इतर सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचे नाव शहरुना असून फिरोजपूर झिरका येथे 29 एप्रिल 2018 रोजी तिचा निकाह झाला होता. त्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या मागणी वरून शुहरुनाला त्रास देणे सुरू केले आणि माहेरहून क्रेटा गाडी घेऊन ये असा आग्रह केला. गाडी न मिळाल्यामुळे तिला माहेरी पाठवण्यात आले.

गेले नऊ महिने शुहरुना माहेरीच राहत होती. 13 ऑक्टोबर 2019 रोजी शुहरुनाचा पती तिच्या माहेरी आला आणि एका पत्राच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिला.