
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, रावळगाव आणि बोरगाव या गावातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे घातले आहेत. 10 हजार लिटर कच्चे रसायन, 560 लिटर गावठी हातभट्टी दारु आणि एक रिक्षासह 3 लाख 85 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला़. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे़.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली़. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली़. गावात हातभट्टीच्या दारुचे उत्पादन होत असल्यास 02352 – 222403 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे़





























































