राजस्थानमध्ये बसपा राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम यांची गाढवावरून धिंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम आणि माजी प्रदेश प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला बसपाच्याच नाराज कार्यकर्त्यांनी काळे फासले. एवढेच नाही तर या दोघांचीही गाढवावरून धिंड काढण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी जयपूर येथील बसपाच्या मुख्यालयाच्या आवारात घडला.

गौतम व मेघवाल यांच्यावर तिकीट विकल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजस्थानमधील या घटनेवरून बसपा प्रमुख मायावती चांगल्याच संतापल्या असून यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. याअगोदर राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाचे आमदार फोडले व आता चळवळीचे काम बिघडवण्यासाठी त्यांच्याकडून वरिष्ठ नेत्यांवर हल्ले घडवले जात आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय व लाजिरवाणा असून काँग्रेस आंबेडकरी चळवळीविरोधात अत्यंत चुकीचे वागत आहे. बसपा कार्यकर्ते यास जशास तसे उत्तर देऊ शकतात, असे मायावतींनी म्हटले आहे.