
दिवाळीनिमित्त विजेची बचत करणाऱया विद्युत उपकरणांच्या खरेदीवर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून ग्राहकांना घसघशीत सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च क्षमतेच्या पंख्याच्या किमतीवर 44 टक्के तर फाइव्ह स्टार रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर 47 टक्क्यांची सवलत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबापुरीत सर्वाधिक वीज पंखे, एसी आणि रेफ्रिजरेटसाठी वापरली जाते. त्यामुळे दिवसागणिक विजेची मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटीने विजेची बचत करणाऱया विद्युत उपकरणांचा वापर वाढवण्यासाठी सवलत योजना सुरू केली आहे. त्यानुसार 50 हजार पंखे आणि 20 हजार रेफ्रिजरेटर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वर्षाला सुमारे साडेतेरा दशलक्ष युनिट विजेची बचत होऊ शकणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी 19122 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

























































