
परभणी जिह्यातील गंगाखेड मतदारसंघात महादेव जानकर यांच्या रासपचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. विशेष म्हणजे गुट्टे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप असून ते सध्या तुरुंगात आहेत.
मतदारांसमोर एकदाही न गेलेल्या गुट्टे यांनी तुरुंगात राहून निवडणूक जिंकल्याने हा मराठवाडय़ाच्या इतिहासात एक विक्रमच ठरला आहे.





























































