मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांची डबल हॅट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहकर विधानसभा मतदार संघात तिसर्‍यांदा विजय मिळवणारे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी विजयाच्या हॅट्रिक सोबत सतत तीन विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून सर्वाधिक मते घेण्याची सुध्दा हॅट्रिक केली आहे.

मेहकर मतदार संघ हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे. तिन वेळा खासदार प्रतापराव जाधव व आता तीनवेळा संजय रायमुलकर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी हा गड मजबूत केला आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदार संघातील विजयी उमेदवारात सर्वाधिक म्हणजे 1,12,038 मते घेऊन आघाडीवर राहिले. तसेच 2009 च्या निवडणुकीत 91,475 मते, 2014 ला 80356 मते व आता 1,12,038 मते घेऊन तिसर्‍यांदा जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याची सुद्धा हॅट्ट्रिक केली.