
महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणूकीचे निकाल गुरुवारी लागले आहेत. विधानसभेतील “लक्ष्मीधर” आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हरयाणामध्ये यंदाच्या विधानसभेत 90 पैकी 84 आमदार करोडपती आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 75 होती, असा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या सर्वेक्षण संस्थेने दिला आहे. विशेष म्हणजे अजय चौटाला यांच्या जनता जननायक पार्टीचे सर्वच्या सर्व 10 आमदार कोट्याधीश आहेत.
एडीआरच्या अहवालानुसार हरयाणाच्या विद्यमान आमदारांची प्रत्येकी संपत्ती सरासरी 18.29 कोटी रुपये आहे. जी 2014 मध्ये सरासरी 12.97 कोटी रुपये होती. सध्याच्या विधानसभेत भाजपचे 40 पैकी 37 आमदार करोडपती असून काँग्रेसचे 31 पैकी 29 आमदार करोडपती आहेत. जननायक जनता पार्टीचे (जेजेपी ) निवडून आलेले सर्व 10 आमदार कोट्याधीश असून त्यांची प्रत्येकी सरासरी संपत्ती 25.26 कोटी रुपये आहे.
गुन्हेगारीचे आरोप असलेले 12 आमदार
गुन्हेगारी आरोप असलेले 12 आमदार आहेत.त्यात काँग्रेसचे 4 ,भाजपचे 2 तर जेजेपीचा 1 आमदार आहे. गेल्या विधानसभेत अशा आमदारांची संख्या 9 होती. अहवालानुसार ९० पैकी 57 आमदार 41 ते 50 वयोगटातील आहेत. 90 पैकी 62 आमदार पदवीधर अथवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत.
























































