राष्ट्रवादी करणार विरोधी पक्षनेतेपदावर दावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीत आघाडीने शंभरी पार केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॉवरमुळे राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळवता आला. यामुळे संख्याबळानुसार आता राष्ट्रवादी पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील तर परळीतून विजयी झालेले आमदार धनंजय मुंडे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

आघाडीच्या जागाकाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे जास्त आमदार निकडून येतील त्या पक्षाला किरोधी पक्षनेतेपद मिळते. 2014 च्या किधानसभा निकडणुकीत काँग्रेस क राष्ट्रकादी कॉग्रेस पराभूत झाल्याने त्यांना किरोधी बाकाकर बसाके लागले होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे 41 तर राष्ट्रकादी 40 असे संख्याबळ झाले. एक आमदार अधिक असल्याने काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले. आमदार अब्दुल सत्तार हेही बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ आणखी घटले, मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाचा हट्ट धरला नव्हता. मात्र आता काँग्रेसपेक्षा तब्बल 10 जागा अधिक असल्याने आघाडीतले सर्वात महत्त्वाचे विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीकडे येणार आहे.

आता विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार विचारविनिमय सुरू आहे. अजित पवार यांच्या मर्जीतील मानले जाणारे धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. त्यामुळे आता विधानसभेत त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल असा अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते अजित पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे, मात्र विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घेण्यापेक्षा राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेतेपद घेणेच अजित पवार अधिक पसंत करतील. माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहे. आपल्या अनुभवातील बोलण्यातून भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सोडत नसल्याने त्यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद द्यावे असा राष्ट्रवादीतील ज्येष्ठांचा आग्रह आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार हेच घेणार आहेत.

राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद देण्यास काँग्रेसही तयार
राष्ट्रकादीने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राष्ट्रवादीला मिळणार आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार हे ठरलेले सूत्र आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली. त्याचप्रमाणे ठरलेल्या गणितानुसार ज्याचे आमदार जास्त त्याला विरोधी पक्षनेतेपद असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीलाच विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे संकेत दिले.