
टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटमध्ये हिंदुस्थानच्या सात बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत प्रवेश करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हिंदुस्थानच्या शिव थापा, निखत झरीन, सुमित सांगवान, आशीष, वॅनलीमपुईया, सिमरनजीत कौर व पूजा रानी या खेळाडूंनी अंतिम चारमध्ये प्रवेश करीत पदक पक्के केले.
चार वेळा आशियाई स्पर्धेचे मेडल जिंकणाऱ्या शिव थापाने 63 किलो वजनी गटात स्थानिक खेळाडू युकी हिराकावा याला 5-0 अशा फरकाने धूळ चारली. याशिवाय निखत झरीनने 51 किलो वजनी गटात, सुमित सांगवानने 91 किलो वजनी गटात, आशीषने 69 किलो वजनी गटात, वॅनलीमपुईयाने 75 किलो वजनी गटात, सिमरनजीत कौरने 60 किलो वजनी गटात आणि पूजा रानीने 75 किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्याला दमदार पंचेस मारत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.






















































