
तुम्ही जर दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला माहित असेल, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. अनेक लोक दुचाकी खरेदी करताना ठीक-ठाक पैसे खर्च करतात. मात्र हेल्मेट खरेदी करताना लोक तितकसं लक्ष देत नाही. आज आम्ही तुम्हाला हेल्मेट विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगणार आहोत.
मार्केटमध्ये एकापेक्षा एक स्टाईलिश आणि मजबूत हेल्मेट उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन मार्केटमध्येही आपण हेल्मेट विकत घेऊ शकता. आपण कुठून ही हेल्मेट खरेदी करा, मात्र त्यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच हेल्मेट खरेदी करा.
- हेल्मेट घेताना नेहमी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असेच हेल्मेट घेतले पाहिजे. मार्केटमध्ये असे अनेक हेल्मेट उपलब्ध आहे जे फक्त डोकंच झाकतात. मात्र असे हेल्मेट अपघात झाल्यास संपूर्ण सुरक्षा पुरवत नाही.
- हेल्मेटची गुणवत्ता खूप महत्वाची असते, अनेक वेळा लोक कमी किंमत बघून हेल्मेट विकत घेतात. मात्र असे हेल्मेट पूर्णपणे सुरक्षित नसतात. यामुळेच पैशांचा जास्त विचार न करता नेहमी ISI मार्क असलेले हेल्मेट खरेदी केले पाहिजे.
- रस्त्याच्या कडेला विकले जाणारे हेल्मेट कमकुवत असू शकतात. या हेल्मेटच्या गुणवत्तेचीही गॅरंटी नसते. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला विकले जाणारे हेल्मेट खरेदी करू नका. कारण हे पूर्णपणे तुमचं संरक्षण करू शकत नाही. हेल्मेट नेहमीच चांगली कंपनी आणि मजबूत खरेदी केले पाहिजे.
- हेल्मेट खरेदी करताना त्याचा आरसा नेहमीच व्यवस्थित तपासा. कारण रात्री प्रवास करताना हेल्मेटचा आरसा ठीक असेल तरच तुम्हाला त्यातून सहज पाहता येईल. त्याच वेळी, हेल्मेटच्या आरशाची गुणवत्ता पावसाळ्यातदेखील खूप महत्वाची असते. म्हणूनच जेव्हा हेल्मेट खरेदी कराल तेव्हा त्याचा आरसा दर्जेदार आहे की नाही याची खात्री करून घ्या.
- हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी आपण ते आपल्या डोक्यात घालून पहा, जेणेकरून हेल्मेट घालून तुम्ही बाहेरील दृश्य व्यवस्थित पाहू शकता की नाही हे तुम्हाला कळेल.

























































