
पानिपत हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं आणि दुर्दैवी वळण. 1761 साली लढल्या गेलेल्या या युद्धात मराठ्यांना हार पत्करावी लागली होती. या युद्धात त्वेषाने लढलेल्या मराठ्यांच्या स्मृती इतिहासाच्या पटलावर अजूनही कोरल्या गेलेल्या आहेत. आता पुन्हा हाच इतिहास जिवंत होणार आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. त्या चर्चेची आता अखेर होणार असून प्रेक्षकांना तो इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. अर्थात कोण कुठल्या भूमिकेत दिसणार आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.




























































