
नळबाजारातील हुसेन भाई मॅन्शन या चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत नऊ बाईक आणि एक मारुती इको कार अशी दहा वाहने जळून खाक झाली. व्यावसायिक आणि निवासी असलेल्या या इमारतीत आग लागताच रहिवाशांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हुसेन भाई मॅन्शन या इमारतीत पहाटे 4.30 काजण्याच्या सुमारास आग लागली. या ठिकाणी असलेले लाकडी सामान, दरकाजे, खिडक्या, दुकानांचे फलक, पडदे यामुळे आग आणखीनच भडकली. आग तिसऱया मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाक घेत मदतकार्य सुरू केले.

























































