चिखल तुडवत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसैनिक शनिवारी शेतकऱ्याच्या बांधावर गेला आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुलूक यांनी धारूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी धारूर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून  शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला.  शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई  मिळवून  देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळूक यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, जिल्हा सहसंघटक योगेश नवले, धारुर तालुका प्रमुख बाळासाहेब कुरुंद,राजकुमार शेटे ,नितीन सद्दिवाल, बंडू शिनगारे आणि शिवसैनिक उपस्थित होते.