आदित्य ठाकरे आज कोकणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘क्यार’ वादळ आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रचंड नुकसान झाल्यामुळे कोकणातील शेतकरीदेखील हवालदिल झाला आहे. या संकटाला कसे तोंड द्यायचे? पुढे नेमके काय करायचे अशा अनेक प्रश्नांचे आणि समस्यांचे काहूर या शेतकऱ्यांच्या डोक्यात उठले आहे. या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे रविवार, 3 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. यावेळी नुकसान झालेल्या भातपिकाची ते पाहणी करणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

असा असेल पाहणी दौरा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे उद्या रविवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता लांजा कुवे येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता राजापूर तारळ, उपळे हातीवले येथे भातशेती नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिह्याकडे रवाना होतील. दुपारी 2.30 वाजता सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली कलमठ येथील भातशेती नुकसानीची पाहणी, दुपारी 3 वाजता कणकवली जळकेवाडी येथील भातशेती नुकसानीची पाहणी, सायंकाळी 4 वाजता कुडाळ निवजे देऊळवाडी येथील भातशेती नुकसानीची पाहणी, सायंकाळी 4.30 वाजता कुडाळ-माणगाव येथील भातशेती नुकसानीची पाहणी, सायंकाळी 5.15 वाजता सावंतवाडी तळवडे येथील भातशेती नुकसानीची पाहणी, सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भातशेती नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, सदानंद चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर हे 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिह्यातील अन्य तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.