
दलित, नवबौद्ध समाज ‘वंचित बहुजन आघाडी’कडे झुकला गेला. हा समाज आपल्या बाजूला आहे की नाही हेच आपण पाहिले नाही. याचाच फटका विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पराभूत उमेदवारांच्या बैठकीत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक झाली. निकाल संमिश्र लागला.
काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे हे लोकांनी लक्षात आणून दिले आहे. यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला. काही ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली, असेही ते म्हणाले.



























































