
हरयाणा सरकारने वायुप्रदूषणाची दखल घेऊन सोमवारी गुरुग्राम आणि फरिदाबाद जिह्यातील शाळा 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले तर सिरसा जिह्यातील शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. सिरसा जिह्यात 6 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतच शाळेचे वर्ग भरतील. हरयाणा सरकारने इतर जिह्यांतील उपयुक्तांना आपल्या परिसरातील वायुप्रदूषणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. शाळेत जाणाऱया बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांची शाळा बंद ठेवण्याचा किंवा शाळेच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात यावा असे सरकारने उपायुक्तांना बजावले आहे. हरयाणातील अनेक जिह्यांत शेतीतील पिकांचा कचरा जाळल्यामुळे धुराते धुके दाटले आहे. मुले आणि वृद्ध यांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असेही सरकारने आरोग्य यंत्रणांना सागितले आहे.






















































