डॉ. अंजारियांनी दिला ‘वंचित’च्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात वंचित बहुजन आघाडीने अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणुकीआधी एमआयएमने साथ सोडली. मात्र त्यानंतर मुस्लिम मतांना ‘वंचित’कडे वळवण्यात अपयशी ठरल्याने वंचित आघाडीचे सरचिटणीस डॉ. ए. आर. अंजारिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

डॉ. अंजारिया यांनी आपल्या राजीनाम्यात महाराष्ट्रातील वंचित बहूजन आघाडीच्या बाजूने अल्पसंख्याक मतदारांना आणण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस असूनही पक्षाला इच्छित निकाल देण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी या पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत सरचिटणीसपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.