कास्टिंग काऊचबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, सुपरस्टारने एकांतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलिवूड असो अथवा बॉलिवूड, किंवा मराठी इंडस्ट्री असो अथवा दाक्षिणात्य इंडस्ट्री येथील कास्टिंग काऊचच्या अनेक बातम्या उडत उडत कानावर येत असतात. परंतु खूप कमी अभिनेते किंवा अभिनेत्री इंडस्ट्रीमधील ही काळी बाजू समोर आणतात. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. अभिनेत्री ईशा कोपिकर हिने एका बड्या सुपरस्टारवर कास्टिंग काऊचचा गंभीर आरोप केल्याने चित्रपटनगरीमध्ये खळबळ उडाली आहे.

चित्रपट कारकीर्दीला काही वर्षांपूर्वी ब्रेक दिलेली अभिनेत्री ईशा कोपिकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चित्रपटांपासून लांब असली तरी तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. याच दरम्यान तिने कास्टिंग काऊचबाबत केलेल्या एका खुलाश्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडमधील आपली कारकीर्द आणि संघर्षाबाबत सांगताना तिने अनेकदा आपल्याला भेदभावाचा सामना करावा लागला असे सांगितले. अनेकदा स्टार किड्सला किंवा कोणाच्या तरी गर्लफ्रेंडला मला मिळणारी भूमिका दिली जायची. यावेळी तिने एका सुपरस्टारने मला एकांतामध्ये भेटण्यास बोलावले होते, असाही उल्लेख केला.

त्या घटनेबाबत बोलताना ईशा सांगते की, ‘हो, मला देखील तो प्रस्ताव आला होता. एका निर्मात्याने आपण नवीन चित्रपट बनवत असल्याचे मला सांगितले. तसेच तुला चांगला चित्रपट मिळण्यासाठी अभिनेत्यांच्या ‘गुड बूक’मध्ये राहण्याची आवश्यकता असल्याचेही त्याने सांगितले. निर्मात्याने मला चित्रपटातील एका बड्या सुपरस्टारचा नंबर दिला आणि त्याला बोलावण्यास सांगितले. मी त्याला फोन केला असता त्याने मला त्याचे संपूर्ण शेड्यूल सांगितले. तो अभिनेता सकाळी लवकर उठायचा आणि जिमला जायचा. त्या अभिनेत्याने मला डबिंग आणि इतर कोणत्यातरी कामादरम्यान भेटण्यास सांगितले.’

प्रसिद्ध अभिनेत्रीचे व्हॉट्सअॅप हॅक, शूटिंगदरम्यान न्यूड व्हिडीओ कॉल आल्याने खळबळ

अभिनेत्याने मला विचारले की मी कोणासोबत येत आही. तर मी त्याला माझ्या ड्रायव्हरसोबत येईन असे उत्तर दिले. यानंतर त्याने कोणालाही सोबत आणू नको, एकटीच ये असे सांगितले. मी त्यावेळी फक्त 15 ते 16 वर्षांची होते. त्यावेळी मला कळत होते की काय होत आहे आणि काय होणार आहे. त्यामुळे मी त्याला आज नाही नंतर येते असे सांगितले आणि तडक निर्मात्याला फोन लावला. मला माझ्या टॅलेंटवर भूमिका हवी आहे, असे त्याला ठासून सांगितल्याचे ईशा म्हणते. यावेळी तिने त्या अभिनेत्याचे आणि निर्मात्याचे नाव घेणे मात्र टाळले.