रायगडातील 15 हजार शेतकऱ्यांना दोन वर्षांनंतरही नुकसानभरपाई नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असतानाच रायगडातील शेतकऱयांना दोन वर्षांपूर्वीची नुकसानभरपाई अद्यापि मिळाले नसल्याचे समोर आले आहे. 15 हजारांहून अधिक शेतकऱयांनी भरपाई जाहीर होऊनही आपल्या बँक खात्याची माहिती प्रशासनाला दिलेली नाही. त्यामुळे 2017 सालातील शेतीच्या नुकसानासाठी आलेला चार कोटींचा निधी पडून आहे.

2017 साली जिह्यात पावसाने शेतकऱयाच्या भातपिकांचे अतोनात नुकसान केले होते. त्यावेळी महसूल विभागाने भातशेतीचे पंचनामे केले होते. त्यानुसार शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र अजूनही 22500 शेतकरी बँक खात्याची माहिती न दिल्याने नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. यातील सात हजार शेतकऱयांनी आपली बँक माहिती तहसील कार्यालयात दिली आहे, तर उर्वरित साडेपंधरा हजार शेतकऱयांनी अद्यापि दिलेली नाही. त्यामुळे हा निधी पडून आहे’