पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मूकश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पूंछ जिल्ह्यात कृष्णघाटी सेक्टरमध्ये पाकड्यांनी मोर्टारचा मारा केला. यात जखमी झालेला एक जवान उपचारादरम्यान शहीद झाला आहे. दरम्यान, जवान पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत असून ही चकमक अद्यापही सुरू आहे.

याआधी 4 नोव्हेंबर रोजीही कश्मीर खोऱ्यातील लाल चौकाजवळ अमीरा कदल भागात भर बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर एक डझनहून अधिक नागरिक जखमी झाले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ज्यात दोन जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत जवानांनी दहशतवाद्यांचे तीन तळ उद्धवस्त केले. या कारवाईत दहा पाकिस्तानी सैनिकांसह अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.