
क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने कोळसा वाहून नेणार्या मालगाडीचे इंजिन बंद पडल्याची घटना आसनगावजवळ घडली. त्यामुळे शनिवारी सलग दुसर्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प झाली. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे चाकरमान्यांना ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.
आसनगाव-आटगावदरम्यान ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे मालगाडीची चाके एकाच ठिकाणी गरागरा फिरल्याने शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. आज पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी कोळसावाहू मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फज्जा उडाला. ऐन गर्दीच्या वेळी हा मनस्ताप सहन करावा लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी आसनगाक स्टेशनमास्तरांना घेराक घालत जाब विचारला.




























































