
हिंदुस्थानी हवाई दल आणि हवाई दल मेंटेनन्स कमांड नागपूर युनिटच्या 65व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘नागपूर एअरफेस्ट 2019’ विशेष एअर शोचा थरार नागपूरकरांनी रविवारी अनुभवला.या शोला नागपूकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला.
हवाई दलाच्या शानदार हवाई कसरतींत हिंदुस्थानी हवाई दलाची शान मानल्या जाणाऱया रंगठहेलिकॉप्टर्स, सूर्यकिरण या विमानांच्या तसेच आकाशगंगा या स्काय डायव्हर्सच्या पथकाने अफलातून प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या या एअर शोला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती,त्यापूर्वी एनसीएसी दलाने मनोरंजक ठएअर मॉडेलिंग शोठ सादर केला.हिंदुस्थानच्या लढाऊ विमानांची हि प्रात्यक्षिके ना भूतो न भविष्यती अशीच झाल्याचे मत नागपूरकरांनी व्यक्त केले.



























































