‘बीकेसी’ कनेक्टरवरून लवकरच ‘बेस्ट’ धावणार, शेकडो प्रवाशांना सुविधा मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे कुर्ला संकुलाला जोडणारा व शीव ते धारावी हे अंतर 30 मिनिटांनी कमी करणारा ‘बीकेसी’ कनेक्टर हा उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर आता या मार्गावरून लवकरच ‘बेस्ट’ बस धावणार आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांना फायदा होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला ‘बीकेसी’ कनेक्टर उड्डाण पूल रविवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या या मार्गाकरून फक्त हलकी वाहने सोडण्यात येत आहेत. मात्र बीकेसी आणि या भागातील प्रवाशांची संख्या व गरज पाहता या मार्गावरून ‘बेस्ट’ बस सुरू करण्याबाबत बेस्ट प्रशासनाकडून सध्या चाचपणी सुरू आहे. यानुसार सध्या बेस्ट उपक्रमाकडे बसगाडय़ांची कमतरता असल्याने नवीन बसमार्ग सुरू करणे शक्य नसल्याने सध्या एकरार्ड नगरहून सायन धारावी मार्गे कला नगर वांद्रेकडे जाणारे बसमार्ग या मार्गावरून कळवणे शक्य असल्याने या पर्यायांचा किचार करण्यात येत आहे. रविवारी सुरू झालेला उन्नत मार्ग नवीन असल्याने सध्या फक्त सात बंगला यारी मार्ग ते  तुर्भे या  मार्गाकरील 355 मर्यादित ही बस या उन्नत मार्गाकरून चालकण्याचा निर्णय ‘बेस्ट’ प्रशासन घेणार आहे.

…तर 1 डिसेंबरपासून नियमित सेवा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे जाऊन या उन्नत मार्गावरून ‘बेस्ट’ बस चालवण्याची परवानगी बेस्ट उपक्रमाला घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच प्रायोगिक तत्वावर 355 मर्यादित ही बस चालवण्यात येईल. या बस गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून 1 डिसेंबरपासून या नव्या उन्नत मार्गावरून नियमित बस चालवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.