
दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा मंगळवार, 3 ते सोमवार, 23 मार्च 2020 तर बारावीची परीक्षा मंगळवार, 18 फेब्रुवारी ते बुधवार, 18 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे.
15 ऑक्टोबरला शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर या दोन्ही परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर वेळापत्रकाविषयी काही सूचना आणि हरकती असल्यास 15 दिवसांत लेखी स्वरूपात देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने पालक, शिक्षकांना केल्या होत्या. या सूचनांनुसार आता अंतिम वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले असून मंडळाच्या www.medahedahedscedboard.medahedarashedtra.goved.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
छापील वेळापत्रकच अंतिम असेल
शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयकडून मिळणाऱया छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य वेबसाईट किंवा इतर यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सऍपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाऊ नये असे आवाहन भोसले यांनी केले.

























































