पिंपळगावला कांदा 7451 रुपये क्विंटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-market

 उन्हाळ कांद्याची आवक अत्यल्प आल्याने एकाच दिवसात नाशिक जिह्यातील कमाल दरात क्विंटलमागे नऊशे रुपयांनी वाढ झाली आहे. पिंपळगाव-बसवंत बाजार समितीत 7451 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला, तर लाल कांद्याची नामपूर येथे सर्वाधिक 6500 रुपये क्विंटल दराने विक्री झाली.

येवला, सटाणा बाजार समितीत काल उन्हाळ कांद्याचा 6600 रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव पुकारला गेला होता. त्यानंतर आज पिंपळगाव बाजार समितीत 7451 रुपये उच्चांक गाठला गेला. त्याखालोखाल दिंडोरीत 7450, येवल्यात 7360, नामपूरला 7300, निफाडला 7051, चांदवड- 7050, लासलगावला 7000 रुपये प्रतिक्विंटल कमाल दर होता. आवक मात्र सर्वच बाजार समित्यांमध्ये 500 ते 3000 क्विंटलच्या घरात आहे. सरासरी दर 5500 ते 6301 असा मिळाला आहे.