
भाजपने शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. पहाटेच राज्यातील राष्ट्रपती राजवट संपवत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पाठिंब्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मुख्यमंत्री भाषणातून अजित पवार तुरुंगात टाकण्याची भाषा करताना दिसत आहेत.
Devendra Fadnavis’s views on his Dy. Chief Minister Ajit Pawar…#MustWatch.
— Alok Shinde (@alokshinde) November 23, 2019
‘जर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तर सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची अवस्था मी काय करणार ते पाहा. आमच्या नाथाभाऊंच्या भाषेत सांगायचं झालं तर मग अजित पवार हे चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग पिसिंग अॅण्ड पिसिंग’ असे बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे.



























































