कोल्हापुरात मटण रटरटले, दर कमी करण्यासाठी हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरात तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मटणाचे दर आवाक्यात आणण्यासाठी गारगोटी, कडगाव ग्रामपंचायतीने येथील मटण विक्रेत्यांवर दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मटणाचे दर 360 ते 380 रुपये प्रति किलो करा अन्यथा दुकाने बंद करा अशी नोटीस येथील ग्रामपंचायतींनी दुकानदारांना धाडली आहे. सक्तीच्या या नोटिसीविरोधात मटण विक्रेत्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर 11 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर जिह्यात मटणाचे दर 560 ते 580 रुपये प्रति किलो असून हे दर कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी गारगोटी व कडगाव ग्रामपंचायतींकडे साकडे घातले आहे. ग्रामपंचायतींनी ही मागणी लक्षात घेता मटणाचे दर 360 ते 380 रुपये प्रति किलो करण्यात यावेत अन्यथा दुकान बंद करण्यात यावे अशी नोटीस मटण विक्रेत्यांना धाडली आहे. याप्रकरणी दाद मागण्यासाठी मटण विक्रेत्यांनी ऍड. धैर्यशील सुतार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. सुतार यांनी बाजू मांडतांना कोर्टाला सांगितले की दुकानदारांनी हे दर कमी नाही केले तर त्यांच्यावर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात येईल.