
सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न शेअर केल्याप्रकरणी दिल्लीत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अमेरिकन एजन्सी आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आदेशावरून अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांपैकी एक आरोपी 61 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे. या वृद्ध व्यक्तीने 19 वर्षाच्या युवकाची फेक प्रोफाईल बनवली होती. या प्रोफाईलवरून तो चाईल्ड पॉर्न शेअर करत असे.
पोलिसांनी संजू राठोड, अमित मंडल, नरेंद्र कुमार, रेवती आनंद तसेच लोकराज यजुर्वेदी या वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. सर्व लोक चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करायचे आणि सोशल मीडियावर पोस्ट करायचे.
आपल्याला या पॉर्न क्लिप व्हॉट्सऍपवर मिळायचा अशी माहिती वृद्ध आरोपी लोकराजने दिली. तसेच तो डाऊनलोड करून आपण तो फेसबुकवर टाकायचो असेही त्यांनी सांगितले.
एनसीआरबी आणि अमेरिकन एजन्सी एनसीएमईसी यांनी संयुक्त विद्यामाने बाल अत्याचाराविरोधात मोहीम आखली आहे. या मोहीमेअंतरर्गत चाईल्ड पॉर्न अपलोड डाऊनलोड करणार्याची माहिती अमेरिका देते. तसेच सोशल मीडियावर अशा प्रकाच्या गोष्टींवरही एजन्सी लक्ष ठेवून आहे.
आयटी कायद्याच्या कलम 67 नुसार सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यावर लाखो रुपयांचा दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ पाहणे, अपलोड करणे आणि फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. असे न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच असे व्हिडीओ तुम्हाला मिळाल्यास ते तत्काळ डीलीट करावे असेही पोलिसांनी सांगितले.


























































