नव्या वर्षात फाइव्ह स्टार फ्रिज महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रतिकात्मक

नव्या वर्षात फाइव्ह स्टारचा दर्जा असलेल्या फ्रिजच्या किमती तब्बल पाच-सहा हजार रुपयांनी वाढणार आहेत. जानेवारीपासून एनर्जी लेबलिंगच्या नव्या नियमानुसार फाइव्ह स्टार एसी, फ्रिज बनवताना कुलिंगसाठी फोमऐवजी व्हॅक्युम पॅनल बसवावे लागणार आहेत. त्याचा खर्च जादा असल्याने फ्रिजच्या किमती वाढणार असल्याचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड अल्पलाईन्सेस मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

एसी आणि फ्रिजसारख्या मशीनमध्ये कॉप्रेसरचा वापर केला जातो. त्याच्या एनर्जी लेबलिंग गाइडलाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने घेतला आहे. त्याचा परिणाम फ्रिजच्या किमतीवर होणार आहे. दरम्यान या वाढत्या किमतीचा पूर्ण इंडस्ट्रीला फटका बसेल असे असोसिएशनचे अध्यक्ष कमल नंदी यांनी स्पष्ट केले आहे.